महाराष्ट्र

अजितदादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा षटकार

जवळपास तीन दशकांहून अधिक काळ राज्यातील राजकारणात अग्रणी असलेल्या आणि विविध सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली.

Swapnil S

जवळपास तीन दशकांहून अधिक काळ राज्यातील राजकारणात अग्रणी असलेल्या आणि विविध सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. अजित पवार हे २०१० साली पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा ‘षटकार’ लगावला. विशेष म्हणजे, राजकीय दबदबा, प्रशासनावर वचक, झटपट निर्णय घेण्याची क्षमता, कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही अजितदादांना एकदाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवता आलेला नाही. २०१९ ते २०२४ या ५ वर्षांच्या कालावधीत ते तिन्ही राज्य सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री झाले होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजितदादांनी फडणवीस यांच्यासोबत घेतलेला पहाटेचा शपथविधी त्यावेळी बराच गाजला होता. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. त्यानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले होते. आता महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर अजितदादा हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात सहावे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

अजित पवार २ हजार ८२७ दिवस उपमुख्यमंत्री

१) १० नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१२ (६८६ दिवस)

२) २५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४ (७०२ दिवस)

३) २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ (४ दिवस)

४) ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ (९१३ दिवस)

५) २ जुलै २०२३ ते ४ डिसेंबर २०२४ (५२२ दिवस)

६) ५ डिसेंबर २०२४ पासून सुरू...

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल