नवी दिल्ली : मे महिन्याला सुरुवात झाल्यापासून सूर्य आग ओकत असतानाच, अकोला हे ४४.९ अंश सेल्सियससह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील १२ शहरांमध्ये तब्बल ४३ ते ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
शनिवारी नवी दिल्लीत ताशी ८० किमी वेगाने वारे वाहू लागले होते. त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे ५०० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.