(मराठा आरक्षण मोर्चाचे आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचे संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

मराठा उमेदवार खूप अधिक संख्येने उभे केले गेले तर...; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; व्यक्त केली चिंता

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक उमेदवार उभे करू शकतो, अशी भीती व्यक्त करून तशी स्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने सल्ला द्यावा, अशी मागणी एका पत्राद्वारे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ६ मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, असंतुष्ट मराठा समाजाने जर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले तर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मतपत्रिका वापरून निवडणुका घ्याव्या लागल्यास मतपेट्या आणि मनुष्यबळाची समस्याही निर्माण होऊ शकते. तसेच यासाठी अतिरिक्त वाहने, त्यांची सुरक्षा याचीही गरज भासेल. सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या जागेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, परभणीतील चाटे पिंपळगाव गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी, आंदोलक मराठा समाजाच्या सांगण्यावरून, १५५ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांना खूप जास्त उमेदवारांचे आव्हान होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीला स्थगिती दिली. या निर्णयाचे पत्र परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस