महाराष्ट्र

एसटीपीच्या नियोजनशून्य कामांमुळे संताप! रस्ते पूर्ववत केले नाही, तर स्थानिकांचा आंदोलनाचा पवित्रा

रस्त्यांची रुंदी कमी असून, खोदलेल्या रस्त्यांची दगडमाती जागेवरच ठेऊन पुढील खोदाईची कामे करण्यात येत आहेत.

Swapnil S

चंद्रकांत सुतार / माथेरान : माथेरानमधील सर्वांगीण दृष्टीने विकासात्मक कामांसाठी सांडपाणी वाहून नेण्यासाठी एसटीपीच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन अथवा प्रशासनाच्या संबंधीत अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्यामुळे सांडपाणी वाहून नेण्यासाठी जे कमी व्यासाचे पाईप लावण्यात येत आहेत, त्यासाठी जागोजागी दोन ते अडीच फूट खोलीचे खड्डे खणले जात आहेत. मुळात बहुतांश ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते असल्याने खड्डे खोदून त्यामध्ये पाईप लावत लावत पुढे काम केले जात आहे. परंतु ज्याठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे, त्याठिकाणी काढण्यात आलेले ब्लॉकस पुन्हा लावण्यात येत नाहीत. या एसटीपीच्या नियोजनशून्य कामांमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, रस्ते पूर्ववत केले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रस्त्यांची रुंदी कमी असून, खोदलेल्या रस्त्यांची दगडमाती जागेवरच ठेऊन पुढील खोदाईची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे निमुळत्या रस्त्यावरून घोडे आणि हातरीक्षा चालणे सुध्दा अवघड बनले आहे. एखाद्या रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका सुध्दा जाऊ शकत नाही, अशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच मातीच्या धुरळ्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या दुकानात, खाद्यगृहात मातीचा धुरळा जात असून व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसत आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदाराने कामगारांकडून खोदाई करण्याचा सपाटा लावला आहे. तुर्तासतारी मुख्य बाजारपेठ ठिकाणी खोदाई करण्यास मनाई केल्यामुळे अन्य ठिकाणी खोदकाम सुरूच आहे.

एसटीपीसारखा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागत असल्याने स्थानिकांमध्ये समाधान दिसून येत आहे, परंतु जी कामे पूर्ण होत आहेत. तेथील क्ले पेव्हर ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे, अन्यथा पुढील कामे होऊ देणार नसल्याचे सुध्दा बोलले जात आहे.

शासनाने नेमलेल्या समित्यांकडून सद्यस्थितीत ज्या ज्या ठिकाणी नव्याने लावण्यात आलेल्या ब्लॉकच्या रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत ते खड्डे भरण्यासाठी परवानगी दिली जात नाही. मग रस्त्यांची खोदाई करण्यासाठी कोणत्या आधारावर ठेकेदाराला परवानगी दिली आहे. मुळात ही कामे चुकीच्या पद्धतीने केली जात आहेत. संबंधीत अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. - गिरीश पवार, दुकानदार, माथेरान

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी