महाराष्ट्र

समृद्धीवर पुन्हा अपघात, तिघांचा मृत्यू

भव्य समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून समृद्धी कमी आणि मृत्यूचा सापळाच अधिक ठरला आहे

Swapnil S

अमरावती : राज्यात समृद्धी आणण्यासाठी उभारण्यात आलेला भव्य समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून समृद्धी कमी आणि मृत्यूचा सापळाच अधिक ठरला आहे. गुरुवारी सकाळी या महामार्गावर अमरावती जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. पहाटे पाच वाजता वडोना शिवनी व्हिलेज या नागपूरपासून १५० किमी अंतरावरील ठिकाणी हा अपघात घडला. दोन्ही वाहने मुंबर्इ-नागपूर एक्स्प्रेस-वेच्या एकाच बाजूला होती. बस अहमदनगरहून छत्तीसगढची राजधानी रायपूरला निघाली होती. अपघातात दोन प्रवासी आणि बसचा क्लिनर असे तिघे जण ठार झाले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस