संग्रहित फोटो 
महाराष्ट्र

कोयना धरणातून पुन्हा विसर्ग, नदीकाठच्या लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा

कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठच्या लोकवस्त्या व गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील कोयना धरणात मंगळवारी १००.३८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापुढे पडणारा पाऊस, धरणाची संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता मंगळवारी धरणातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठच्या लोकवस्त्या व गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या १००.३८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ४.८७ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी ४१,२६५ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आगामी काळातील पाऊस व संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी धरण पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे कार्यान्वित करून ४० मेगावॅट वीजनिर्मिती केली. त्यानंतर प्रतिसेकंद २,१०० क्युसेक, तर संध्याकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे १ फूट ३ इंचांनी वर उचलून त्यातून १०,३५५ क्युसेक असे पूर्वेकडे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक पाणी सोडले. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठच्या लोकवस्त्या व संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी