भोंदू अशोक खरात प्रकरण : ‘साप दाखवून खरातने घातली भीती’; एका प्रकरणात मिळाली पोलीस कोठडी  (संग्रहित फोटो)
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : ‘साप दाखवून खरातने घातली भीती’; एका प्रकरणात मिळाली पोलीस कोठडी

भोंदू अशोक खरातला ५ कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने शुक्रवारी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Swapnil S

नाशिक : भोंदू अशोक खरातला ५ कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने शुक्रवारी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी फिर्यादीच्या वकिलांनी अशोक खरातने आपल्या अशिलाला साप दाखवून मृत्यूची भीती दाखवल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. भोंदू खरातच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष तपास पथकाने खरातचा ताबा घेतल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने खरातला राजेंद्र अशोक जासूद यांची ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, राजेंद्र जासूद यांना त्यांचा लॉजिस्टिकच्या व्यवसायाचा जगभर विस्तार करायचा होता. त्यांनी याविषयी अशोक खरातचा सल्ला घेण्याचा विचार केला. ते त्यांच्याकडे गेले असता खरातने त्यांना अवतार पूजा करण्याचा सल्ला दिला. पूजा करताना खरातने जासूद यांना नकली साप दाखवून घाबरवण्याचाही प्रयत्न केला.

सुनावणीत अशोक खरातचे वकील म्हणाले, माझ्या अशिलाविरोधात (अशोक खरात) वावी पोलिसांत सर्वात पहिला गुन्हा दाखल केला होता. तो दिनेश परब व राजेंद्र जासूद यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. हा ५ कोटींच्या खंडणीचा गुन्हा होता. सरकारी पक्षाच्या युक्तिवादात वावीच्या या गुन्ह्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यानंतर नीरज जाधव नामक व्यक्ती पुढे आली. त्याने स्पाय कॅमेरा लावून व्हिडिओ चित्रित केले. ते सर्व व्हिडिओ त्याने दिनेश परबला दिले. या परबला हायकोर्टाने जामीन मंजूर केला, तर पोलिसांनी नीरज जाधवपुढे माफीचा साक्षीदार होण्याचा प्रस्ताव ठेवला.

अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरातला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आता पोलिस खरातने आणखी किती जणांची आर्थिक फसवणूक केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश