महाराष्ट्र

ठाकरे समर्थक शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी

कल्याण : उद्धव ठाकरे यांचे समर्थक आणि शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी कामावर जात असताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील पुणा लिंक रोड येथे घडली आहे. पालांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्यामागे माजी नगरसेवक महेश गायकवाड असल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. या आरोपाबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना विचारले असता हा आरोप फेटाळत, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे गायकवाड यांनी सांगितले.

गेले काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत त्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर मी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार करत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

या सगळ्या सत्तांतरणानंतर विविध ठिकाणांहून शिवसेनेतील अनेक नगरसेवक आणि खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र कल्याण येथील हर्षवर्धन पालांडे हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटातच राहणार असल्याचे सांगत होते. याच पार्श्वभूमीवर मला शिंदे गटात समाविष्ट झालेल्या महेश गायकवाड यांनी मला मारहाण केली असल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. मात्र महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी एक समाजप्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा घटनांना मी पाठिंबा देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

'भटकती आत्मा' पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर टीका; शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे प्रत्युत्तर

'काँग्रेस'चा संपत्तीच्या फेरवाटपाचा घातक खेळ

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर...

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल