महाराष्ट्र

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

Swapnil S

मुंबई : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षण मंगळवारपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण पाल‍िका क्षेत्रात करण्यात येणार असून, यासाठी पालिकेचा सहयोग असणार आहे. पालिकेचे अध‍िकारी व कर्मचारी संपूर्ण मुंबईत सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंटमध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन पाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असेल. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून द्यावी. ही माहिती भ्रमणध्वनीवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲपमध्ये ज़तन केली जाणार आहे. तरी पाल‍िका हदीतील रह‍िवाशांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस