महाराष्ट्र

आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

वृत्तसंस्था

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटात गेलेले चर्चेतील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला करण्यात आला. अमरावती येथील अंजनगाव सुर्जीमधील देवनाथ मठातून दर्शन करून निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली. यावेळी ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणादेखील देण्यात आल्या.

रविवारी दुपारी ३ वाजता संतोष बांगर हे देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनांचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे, हे कळले नाही. या घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

मागील अनेक दिवसांपासून संतोष बांगर हे चर्चेत आहेत. बांगर हे सुरुवातीला शिवसेना गटात होते; मात्र ऐनवेळी ते शिंदे गटात सामील झाले. तसेच त्यांनी मुंबईत शक्तिप्रदर्शनदेखील केले होते. याव्यतिरिक्त ते उद्धव ठाकरे गटावर टीका करतानादेखील दिसून आले होते. शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याआधी उदय सामंत याच्या गाडीवरही पुण्यात हल्ला झाला होता.

पुन्हा हल्ला करा, मग दाखवतो

“माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी नारेबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर संतोष बांगर काय आहे, हे त्यांना दाखवले असते,” असे बांगर म्हणाले.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का