महाराष्ट्र

आधारवाडी कारागृहात कैद्यावर हल्ला

वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्याचा राग मनात ठेवून कैद्यावर हल्ला केल्याची घटना कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील सर्कल क्र.५ मध्ये गुरुवारी घडली.

Swapnil S

डोंबिवली : वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्याचा राग मनात ठेवून कैद्यावर हल्ला केल्याची घटना कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील सर्कल क्र.५ मध्ये गुरुवारी घडली. याप्रकरणी तुरुंग अधिकारी शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून कैदी युवराज पवार यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद उर्फ मारी रवींद्र राम असे हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. आधारवाडी कारागृहाच्या आतमध्ये सर्कल क्र. ५ च्या गेट समोर कैदी युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार याचे कैदी रोशन घोरपडे यांच्याशी यापूर्वी झालेल्या वादामध्ये कैदी अरविंद उर्फ मारी रवींद्र राम याने मध्यस्थी केली होती.

याचा राग मनात धरून कैदी युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार याने ब्लेडच्या अर्धवट तुकड्याच्या सहाय्याने कैदी अरविंद उर्फ मारी रवींद्र राम याच्या डाव्या गालावर, डाव्या कानाच्या बाजूला तसेच डोक्याच्या मागील बाजूस वार करून दुखापत केली. याप्रकरणी न्यायालयीन बंदी क्रमांक ५६५३/२४ युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा

'डीजे लावणी', अश्लील डान्सवर तातडीने बंदी घाला! चित्रपट महामंडळाची सरकारकडे मागणी

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट