महाराष्ट्र

फक्त शिव्या आणि शिव्या, राज्यातील दोन जेष्ठ नेत्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Swapnil S

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि दुसरे माजी मंत्री बबनवराव लोणीकर यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जात आहे.यात लोणीकर हे टोपे यांना शिवीगाळ करताना ऐकू येत आहे, शिवाय धमकीही देत आहेत. यानंतर लोणीकर यांनी स्पष्टीकरण देत ती क्लिप बनावट असून आपण ऐकली नसल्याचं सांगितलंय.

बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांच्यात जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उपाध्यक्ष निवडीवरुन वाद आहे. काही दिवासांपूर्वी या प्रकरणी राजेश टोपे यांच्या वाहनावर जिल्हा बँकेच्या बाहेर दगडफेक देखील झाली होती. यात टोपे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर टोपेंच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. आता ही क्लिप व्हायरल झाल्याने नवा वाद उद्बवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी लोणीकरांच्या मुलाची निवड करणं ठरलेलं असताना अन्य व्यक्तीची निवड झाली, यासंदर्भातील संवाद असून त्याचा राग या क्लिपमध्ये काढला जात आहे. 'नवशक्ति' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

यात कथिक ऑडिओ क्लिपमध्ये राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यात बँकेच्या उपाध्यक्ष पदावरुन बोलणं सुरु होतं आणि संवादाच्या शेवटी शिवगाळ केली जाते. बबनराव लोणीकर यांनी ही क्लिप बनवाट असल्याचं म्हटलं आहे. तर राजेश टोपे यांच्याकडून अजून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोन्ही जेष्ठे नेते असून दोन्ही नेत्यांनी महत्वाची मंत्रिपदे भूषवलेली आहेत. जर ही ऑडिओ क्लिप बनावट असेल तर ज्यांनी कोणी हे केलंय त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे. कथित व्हायरल क्लिपमध्ये शिव्या असल्याने ती क्लिप तसंच त्यातील संवाद याठिकाणी दिलेला नाही.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस