महाराष्ट्र

महाड बस स्थानकात एड्सबाबत जनजागृती

एचआयव्ही एड्स संक्रमित व्यक्तीसोबत भेदभाव झाल्यास राज्यातील लोकपाल अधिकाऱ्यांकडे किंवा १०९७ वर आपण तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.

Swapnil S

पोलादपूर : जिल्हा आरोग्य विभाग रायगड अलिबाग जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा शल्यचिकित्सक रायगड व संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बंधने पाळा, एड्स टाळा’ या पथनाट्यातून महाड बसस्थानक येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास महाड आयसीटीसी धनश्री नितिश महाबळेश्वरकर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय महाड, वासंती पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सुपरवायझर समीर सुतार, लिंक वर्कर अश्विनी बाळगुडे, स्वयंसिद्धा संस्थेचे किरण साळवी तसेच पथनाट्य कलाकार श्रुती नाईक, पार्थ म्हात्रे, यश म्हात्रे, निशांत नवखारकर, राज पाटील, ईशा ठाकूर, मेहविश कासुकर आदी उपस्थित होते. जर शैक्षणिक क्षेत्रात हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही कार्यालयात एचआयव्ही एड्स संक्रमित व्यक्तीसोबत भेदभाव झाल्यास राज्यातील लोकपाल अधिकाऱ्यांकडे किंवा १०९७ वर आपण तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवायची नाही; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानानंतर खळबळ

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

BARC च्या बनावट वैज्ञानिकाला अटक; अणूबॉम्बच्या आराखड्यासह सुरक्षा भंगाचा संशय