महाराष्ट्र

Baba Maharaj Satarakar: भागवत धर्माचा प्रचारक हरपला! ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या ८९ वर्षी ठेवला देह

त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी दादा महाराजांच्या किर्तनात चाल म्हटली होती

नवशक्ती Web Desk

भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक आणि ज्येष्ठ किर्तनकार अशी ख्याती असलेले बाबा महाराज सातारकर यांनी निधन झालं आहे. बाबा महाराजांनी वयाच्या ८९ व्या वर्षी आपला देह ठेवला. त्याची जगभरात ज्येष्ठ किर्तनकार अशी ख्याती होती. बाबा महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशेवर्षाची परंपरा जपली होती. ते आपल्या आजोबा, आई-वडिलांसोबत लहानपणापासूनच वारी करायचे. त्यांची वारीची परंपरा ही वयाच्या ८३ वर्षापर्यंत सुरु ठेवली होती. बाबा महाराज यांच्यावर दादा महाराजांचा पगडा होता. ते लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते. ते लहानपणापासून बाब महाराजांसमोर बसून किर्तन ऐकायचे.

५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात बाबा महाराजांचा जन्म झाला. त्यांनी आपलं दहावीपर्यंतच शिक्षण दे इंग्रजीतून पूर्ण केलं. बाबा महाराजांच्या घरातच शेकडोवर्षापासूनची परंपरा आहे. बाबा महाराजारंनी शेवटच्या श्वासापर्यंत ही परंपरा जपली. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी दादा महाराजांच्या किर्तनात चाल म्हटली होती. त्यांनी दादा महाराजांना पायाला दखम असतानाही चिखलात उभं राहून कीर्तन करताना पाहिलं आणि हिच निष्ठा शेवटपर्यंत जपली.

दादा महाराज हे बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा होते. त्यांनी एक नातू म्हणून आजोबांकडून सर्व गुण आत्महसात केलं. त्यांच्या पूर्ण पिढीत आजवर कोणी वारी चुकवलेली नाही. आजोबा दादा महाराज, वडील, भाऊ महाराज त्यांनंतर बाब महाराज आणि आता पुढची पिढी मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी त्यांची संपूर्ण पिढी भागवत धर्माच्या सेवेत आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी बाबा महाराज यांनी लिहिलेल्या लेखात सांगितले होते की, माझं वय ८३ वर्ष आणि माझी वारी ८४ वी. त्याचं कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. वयोमानाने वारी चालणं शक्य होत नसताना देखील चार पावले चालून गाडीतून वारी अनुभवायचे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली