महाराष्ट्र

बांगलादेशी नागरिकाकडे रत्नागिरीचा जन्मदाखला; कागदपत्रावरून आले समोर

शहरालगतच्या शिरगाव ग्रामपंचायत येथून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

रत्नागिरी : शहरालगतच्या शिरगाव ग्रामपंचायत येथून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरून ही बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी जन्मदाखला देणाऱ्या तत्कालीन शिरगाव सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

मोहम्मद इद्रिस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ शिरगाव ग्रामपंचायत येथील जन्मदाखला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्याच्या जन्मदाखल्यावर पत्ता, जन्म १ मे १९८३ रोजी उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि रत्नागिरी असा आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्मदाखला तयार केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवायची नाही; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानानंतर खळबळ

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

BARC च्या बनावट वैज्ञानिकाला अटक; अणूबॉम्बच्या आराखड्यासह सुरक्षा भंगाचा संशय