महाराष्ट्र

Baramati loksabha : सुनेत्रा पवार देणार सुप्रिया सुळेंना टक्कर? संजय राऊत यांनी दोनच वाक्यात विषय संपवला

बारामती मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना मोठ आव्हान देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

नवशक्ती Web Desk

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मोठी टक्कर देण्याची तयारी सुरु असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. सुळे यांच्या बारामती मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना मोठ आव्हान देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा सामना त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्याशी होण्याची शक्यता सांगितली जात आहे. यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत याबाबत बोलताना म्हणाले की, "मला वाटत नाही की सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात भांडण होईल. या अफवा आहेत." असं म्हणत निवडणूक कोणीही लढवली तरी सुप्रिया सुळे विजयी होतील, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण जणू राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून रुजलं आहे. असं असताना सुप्रिया सुळे आपल्या बालेकिल्ल्यात शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. अजित पवार गटाने भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने पवार घराण्यातील कोणालातरी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहेत.

संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, असं होईल असं वाटत नाही. या अफवा सुरू आहेत. आम्हाला राजकारणही कळतं, आम्ही राज्य केलं. पवार घराण्यालाही आम्ही ओळखतो आणि बारामतीचे राजकारणही आम्हाला माहीत आहे. कोणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळे याच जिंकतील. संजय राऊत यांनी केलेलं विधान कितपत खरं ठरतं हे मात्र निवडणुकीनंतर दिसून येणार आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा