महाराष्ट्र

"विचार नसलेली वज्रमूठ..." या केंद्रीय मंत्र्याने केली महाविकास आघाडीवर टीका

प्रतिनिधी

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. गेले बरेच दिवस या सभेची चांगलीच चर्चा आहे. रामनवमीच्या आदल्यादिवशी झालेल्या हिंसाचारानंतर या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. ही सभा होऊ नये यासाठी छ. संभाजीनगरमध्ये दंगली घडवून आणल्या, अशा टीका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केल्या होत्या. यावर भाजपकडून अनेकदा उत्तरही देण्यात आले. यावेळी या सभेवर बोलताना केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले की, "ही विचार नसलेली वज्रमूठ, फक्त भाजपच्या विरोधात आहेत. ती मुठ कधीही एकत्रित टिकू शकणार नाही."

मंत्री भागवत कराड म्हणाले की, "एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वीर सावरकरांचे कौतुक करतात, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते हे सावरकरांवर टीका करतात, हा विरोधाभास आहे. यामुळे ही विचारांची वज्रमूठ नाही तर फक्त भाजपला विरोध करण्यासाठीची वज्रमूठ आहे." असा हल्लाबोल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सावरकर गौरव यात्रा ही ताकद दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्या कामाला उजाळा देण्यासाठी आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. "भारत मातेचे पूजन महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गट भारत मातेचे पूजन करते, पणहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का?" असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस