महाराष्ट्र

‘आरसीएफ’च्या थळ प्रकल्पात स्फोट; तीन ठार

कंपनीच्या थळ येथील प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लान्टमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते.

प्रतिनिधी

‘आरसीएफ’ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पात बुधवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

‘राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड’ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लान्टमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते. ‘ऍरिस्टो ट्रोटल’ नामक कंपनीला ही यंत्रणा बदलण्याचे काम देण्यात आले होते. या कंपनीमार्फत वातानुकूलन यंत्रणा बसविताना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अंकित शर्मा, फैजून जुनेद शेख (३२), दिलशाद आस्लम इदनिकी (२९) यांचा मृत्यू झाला असून, साहिद मोहम्मद सिद्दीकी (२३), जितेंद्र शेळके (३४) व अतिनदर मनोज हे तिघे जखमी झाले आहेत.

पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' अनावश्यक; ७९ (अ) अंतर्गत मुरलेल्या भ्रष्टाचाराला उच्च न्यायालयाचा सुरुंग

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'

पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा

IND vs AUS : रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून

Women’s World Cup : गोलंदाजीत सुधारणा करण्याचे आव्हान; भारताची आज इंग्लंडशी गाठ