महाराष्ट्र

पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दल सतर्क झाले असून संबंधित परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Swapnil S

पुणे : पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दल सतर्क झाले असून संबंधित परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये केवळ पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये आयईडी (IED) बॉम्बस्फोटाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, घातपात घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आल्याचे समोर आले आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच पुणे पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग तात्काळ सतर्क झाले. हा ई-मेल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठविण्यात आला, तसेच तो खरा आहे की केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठविण्यात आलेला बनावट संदेश आहे, याची तांत्रिक तपासणी सायबर विभागाकडून सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापौर कार्यालयासह नागपूरमधील संवेदनशील परिसरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

संशयास्पद वस्तू आढळली नाही

आतापर्यंत करण्यात आलेल्या कसून तपासणीत संबंधित परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आलेले नाही. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धमकीच्या ई-मेलमागील व्यक्ती अथवा गटाचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहेत.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली