महाराष्ट्र

वसईत मुलीची निर्घृण हत्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

वसईमध्ये लोखंडी पान्यानं प्रहार करुन एका तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Suraj Sakunde

मुंबई: वसईमध्ये लोखंडी पान्यानं प्रहार करुन एका तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. वाळीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. वसईत तरुणीची हत्या होणं हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून आरोपीला अटक केली असल्याचं त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी आरोपीविरोधात बाजू मांडली जाईल, असंही फडणवीस म्हणाले.

कठोर कारवाई करण्याचे निर्देश

देवेंद्र फडणवीस एक्स (पूर्वीचे ट्वीटर) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हणाले की, वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे."

भररस्त्यात केली निर्घृण हत्या-

आरती रामदुलार यादव (वय २२) असं मृत तरूणीचं नाव असून ती नालासोपाऱ्यातील गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीजमध्ये काम करत होती. आरोपी रोहित यादव (वय २९) याच्याशी तिचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती.

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितनं तिला अडवले. यावेळी दोघांचं भांडण झालं. यावेळी संतप्त झालेल्या रोहितनं सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने आरतीवर एकामागून एक असे सुमारे १५ वेळा प्रहार केले. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून होता. वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार