पुणे : कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंग' आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित आस्थापनाचा अन्नसुरक्षा परवाना रद्द केला आहे. एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्वयंपाकघर आणि अन्नसाठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न, औषधे आणि इतर संबंधित उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत पुण्यातील खाद्य आस्थापनांचीही तपासणी करण्यात येत आहे. कॅम्पमधील बर्गर किंगच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, बेकायदा गर्भपाताच्या औषधांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या ांविरोधात ही निरीक्षकांना मिळालल्या एफडीएने कारवाई केली आहे. नागपूरमध्ये औषध माहितीन त र पोलिसांच्या सहकार्याने विनोबा भावे नगर येथील एका दवाखान्याची तपासणी करण्यात आली. या कारवाईत विनापरवाना औषधसाठा आढळून आला. त्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांच्या किट्सचा समावेश होता. काही औषधांच्या उत्पादकाचे लेबल आणि बॅच क्रमांक झाकण्यात किंवा खोडण्यात आल्याचेही आढळले. या प्रकरणात एकूण ४५ हजार ६४९ रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त करण्यात आला असून, डॉक्टरांसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूरमध्येही ऑनलाइन माध्यमातून गर्भपाताच्या औषधांची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. संबंधित व्यक्तीच्या घरातून २६ एमटीपी किट जप्त करण्यात आल्या. या औषधसाठ्याची किंमत ९ हजार ५३२ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणीही गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
विनापरवाना किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एमटीपी किटसारखी औषधे खरेदी करून वैद्यकीय तज्ज्ञांच्या वापरणे देखरेखीशिवाय आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा औषधांची बेकायदा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.