महाराष्ट्र

‘कॅम्लिन’चे संस्थापक सुभाष दांडेकर यांचे निधन

‘कॅम्लिन फाईन सायन्सेस’चे संस्थापक व ‘कोकुयो कॅम्लिन’चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

Swapnil S

मुंबई : ‘कॅम्लिन फाईन सायन्सेस’चे संस्थापक व ‘कोकुयो कॅम्लिन’चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा आशिष व मुलगी अनघा असा परिवार आहे.

सुभाष दांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दांडेकर परिवारातील सदस्य, कॅम्लिन समूहातील कर्मचारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

सामाजिक भान, कलेची जाण व उद्यमशीलता अंगी बाळगणाऱ्या सुभाष दांडेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. सुभाष दांडेकर यांच्या सामाजिक दायित्त्वाच्या भूमिकेमुळे ते शुश्रुषा सिटिझन्स को-ऑप रुग्णालयाशी जोडले गेले. विविध सामाजिक संस्था तसेच `सिकॉम`सारख्या अनेक उद्योग संघटनांचे ते मार्गदर्शक बनले. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे ते माजी अध्यक्ष होते. संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र’, ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ अशा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत