महाराष्ट्र

सेल्फीसाठी कार थांबवली अन‌् ५०० फूट दरीत कोसळली; तीन जणांचा मृत्यू

सेल्फीच्या मोहापायी कार थेट ५०० फूट दरीत कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे

प्रतिनिधी

सेल्फी काढण्याच्या नादात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. कधी पाय घसरून तर कधी तोल जाऊन सेल्फी काढणाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आपण पाहिल्या असतील; मात्र सेल्फीच्या मोहापायी कार थेट ५०० फूट दरीत कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे. सेल्फी काढण्यासाठी कार रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ती थेट ५०० फूट खोल ताम्हिणी घाटातील दरीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात ऋषभ किशोर चव्हाण (२४), कृष्णा पंडित राठोड (२७), सौरभ श्रीकांत भिंगे (२५) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत, तर चालक रोहन परशुराम गाडे (२६), प्रवीण गजानन सरकटे (२६), रोहन किशोर चव्हाण (२२) अशी जखमींची नाव आहेत. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पुणे-माणगाव या राष्ट्रीय महामार्गावर मंगळूरपीर वाशिम येथील पर्यटक मारुती स्विफ्ट कारने पुण्यावरून देवकुंड येथे जात होते. शनिवारी संध्याकाळी कोंडेथर- सणसवाडी गावाच्या हद्दीत आल्यानंतर त्यांना निसर्गासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढण्यासाठी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तीव्र उतार आणि वळणावर ड्रायव्हरने ब्रेक मारला तरीही कार चिखलामध्ये स्लीप होऊन थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली.

दरीत कोसळल्यानंतर स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याचे माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. अपघाताची माहिती समजताच माणगावचे पोलीस पथक रेस्क्यू टीमसह तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव