प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

केवळ तीन दिवसांत चोरीचा छडा; मध्य रेल्वेच्या RPF ची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव येथे लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून सुमारे तीन लाखांचे दागिने चोरीला गेले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अवघ्या ३ दिवसांत चोरीचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीला आणला. दलाने तांत्रिक कौशल्याने तपासणी करत या गुन्ह्याचा छडा लावला.

Swapnil S

मुंबई : जळगाव येथे लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून सुमारे तीन लाखांचे दागिने चोरीला गेले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अवघ्या ३ दिवसांत चोरीचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीला आणला. दलाने तांत्रिक कौशल्याने तपासणी करत या गुन्ह्याचा छडा लावला.

जळगाव जवळ गाडी क्रमांक १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली. एका महिला प्रवाशाच्या पर्समधील अंदाजे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणाची नोंद जीआरपी भुसावळ/जळगाव येथे करण्यात आली.

सहाय्यक उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायांचा समावेश असलेल्या आरपीएफ च्या विशेष पथकाने हा गुन्हा उघडकीस आणत मुख्य आरोपी महेश लिंगायत याला केवळ ३ दिवसांत अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच पोरबंदर–शालीमार एक्सप्रेसमध्ये झालेल्या आणखी एका चोरीच्या प्रकरणातील सहभागाची माहिती दिली. यामध्ये प्रवाशाच्या पिशवीतील सुमारे ९ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग