Mumbai Rains: Roads Waterlogged, Trains Services Hit Due To Heavy Showers In City ANI
महाराष्ट्र

Mumbai Rains: डेक्कन ते प्रगती, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या ५ एस्क्प्रेस गाड्या रद्द

Tejashree Gaikwad

Mumbai rains LIVE Updates: मुंबईत रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे तसेच लोकल ट्रेन आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पाऊस या आठवड्यात सुरू राहण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ८ जुलै रोजी मुंबईत दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर पाणी साचल्याने सुमारे पाच गाड्या रद्द करण्यात आल्या. विजेच्या गडगडाटासह अजून पाऊस येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे विभागातील विविध स्थानकांवर पाणी साचल्याने सुमारे पाच गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने सोमवारी सकाळी दिली. यापूर्वी बाधित झालेल्या कल्याण ते कसारा दरम्यानची सेवा पूर्ववत झाली आहे.

कोणत्या एस्क्प्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत?

१२११० (MMR-CSMT)

११०१० (पुणे-CSMT)

१२१२४ (पुणे सीएसएमटी डेक्कन)

११००७ (पुणे-सीएसएमटी डेक्कन)

१२१२७ (सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस)

पावसाच्या पाण्याने रुळांवर पाणी साचले त्यामुळे अनेक स्थानकांवर जवळपास तासभर खोळंबा झाला. सेवा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी गाड्या संथ गतीने धावत आहेत. कल्याण ते कसारा दरम्यान गाड्या मर्यादित वेगाने धावत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सोशल मीडियाद्वारे अपडेट दिले आहे की मुंबईत सकाळी १ ते सकाळी ७ या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले, त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

बेस्टचे मार्ग वळवले

पावसामुळे पाणी साचल्याने अनेक बेस्ट बस त्यांच्या नियमित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्याचे बेस्ट बस परिवहनने सांगितले आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दिवसभर मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता असल्याने, बीएमसीने मुंबई परिसरातील सर्व बीएमसी, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली. "आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल," असे बीएमसीने सांगितले आहे.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना