ANI
ANI
महाराष्ट्र

राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

नवशक्ती Web Desk

मान्सूनने देशभरातून माघार घेतली असली तरी काही भागात अजूनही मान्सून हजेरी लावताना दिसत आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांता जोरदार पाऊस झाला आहे. तर बुधवार रोजी राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सान्सून पूर्व आणि ईशान्य भारतातून माघारी परतला आहे. आंध्रप्रदेशचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. नैऋत्य मान्सूनने मंगळवारी बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारत, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस पावसाच वातावरण दिसणार आहे.

इकडे महाराष्ट्रात मात्र कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाण्यात उकाडा जानवणार आहे. तसंच देशातील अनेक राज्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितलं की, राजस्थान, पंजाब आणि रहियाणाच्या काही बागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारी भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा