महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांसह मनोज जरांगेंच्या भेटीला ; अंतरवाली सराटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून

नवशक्ती Web Desk

जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे आपलं उपोषण मागे घेणार असून यानंतर साखळी उपोषण करणार आहेत. त्यामुळे या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. राज्य सरकारने आपलं शिष्टमंडळ पाठवून तीन वेळा मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी सर्व पक्षीय बैठकीनंतर आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबाबत दोषी अधिकाऱ्यांवर बडर्फीची कारवाई करणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, असे निर्णय घेण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सहमती दर्शवली.

या सर्वपक्षीय बैठकीतील चर्चेचा अहवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी शासनासमोर पाच अटी ठेवून एक महिन्याचा वेळ देण्याची सहमती दर्शवली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाने लेखी आश्वासन द्यावे, त्यानंतर आपण आमरण उपोषण मागे घेवू, इथेच साखळी उपोषण करु, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या, झाडून घेतल्या स्वतःवर गोळ्या

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक