महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यात जोरदार स्वागत

शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले