महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांच्या भेटीला ; निवारा केंद्राची केली पाहणी

नवशक्ती Web Desk

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने गाव मलब्याखाली गाडलं गेलं होतं. यात अनेक गावकऱ्यांचा मत्यू झाला होता. यानंतर याठिकाणी मदत कार्य करण्यात आलं. सरकार इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. इथल्या रहिवाश्यांसाठी सरकारने खालापूर चौक या भागात सुंदर गांव उभं केलं आहे. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना सरकारकडून अन्न, वस्त्र आणि निवार या सुविधा पुरवण्यात येत आहेत. यात तीन वेळचं २०० जणांचं जेवण, वैद्यकीय सेवा, लहान मुलांना नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, २४ तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन या सुविधांचा समावेश आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एक शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी असलेल्या निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इर्शाळवाडीच्या जनतेशी संवाद साधला. इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांच्या या तात्पुरत्या निवारा केंद्रात १४४ आपत्तीग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवारा केंद्राला भेट देवून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली.

काय आहे प्रकरण?

20 जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या डोंगरपायथ्याच्या गावावर गडाचा कडा कोसळला. यात गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. गावातील जवळपास ४० घर याखाली दबली गेली होती. काही तासांतच ही बातमी राज्यभऱ पसरली. यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी धाव घेतली. घटनेंनंतर शक्य तेवढ्या लवकर याठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आलं. या घटनेक अनेकांना वाचवण्यात यश आलं. मात्र, अनेक नागिकांचा यात जीव गेला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखाची आर्थीक मदत जाहीर करुन त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आल्याचं म्हटलं होतं. याच निवारा केंद्राला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस