मुंबई : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे. यानिमित्त दरवर्षी ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तसेच ३ ते ९ ऑक्टोबर रोजी दरवर्षी ‘अभिजात मराठी भाषा आठवडा’ साजरा केला जाईल. याबाबतचा सरकारी अध्यादेश मराठी भाषा विभागाने जारी केला आहे.
गेल्यावर्षी केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा दिला होता.
सरकारी अध्यादेशानुसार, या दिवशी सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालय, सार्वजनिक उपक्रमाची कार्यालय, विद्यापीठ, शाळा, खासगी कंपन्या व वित्तीय संस्थांमध्ये मराठी भाषेबाबत कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. यात व्याख्याने, परिसंवाद, निबंध स्पर्धा, कोडी, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे अध्यादेशात म्हटले आहे.