एक्स @advakash
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष; गरीब, गरजू रुग्णांना मिळणार तत्काळ मदत

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.

गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रथम मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. स्थानिक गरीब व गरजू बांधवांना या कक्षाचा लाभ होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा