संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

'छावा' टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? बघा व्हिडिओ

अभिनेता विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सध्या चांगलाच धुमाकूळ घालत असून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा सिनेमा राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (दि.१९) सकाळी माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला.

Krantee V. Kale

अभिनेता विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सध्या चांगलाच धुमाकूळ घालत असून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा सिनेमा राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी जोर धरत आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (दि.१९) सकाळी माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, "इतर राज्ये जेव्हा सिनेमा टॅक्स फ्री करतात तेव्हा करमणूक कर माफ करत असतात. पण, महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द केलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. म्हणून अशाप्रकारची करमाफी देण्याकरीता तो करच आपल्याकडे नाहीये", असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, या चित्रपटाच्या प्रमोशनकरीता आणि किमान छत्रपती शंभुराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याकरता जे काही चांगलं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

त्यांना माफ करणार नाही...

छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजीराजांचा अवमान करणाऱ्या अभिनेत्याबाबत विचारले असता, अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, अशाप्रकारे कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमीही माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

'छावा' सिनेमाचं कौतुक

छत्रपती संभाजी महाराज, ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ताही प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था; महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला आणि (ज्या ज्या लोकांनी सिनेमा बघितला त्यांनी सांगितलं की) इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक अशाप्रकारचा सिनेमा तयार झालेला आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि मुख्य अभिनेता विकी कौशलचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

बघा व्हिडिओ

त्यापूर्वी आजच्या (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत