संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासूने घेतली मनोज जरांगेंची भेट; बंद दाराआड चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी बुधवारी पहाटे जरांगे पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.

Swapnil S

अंतरवाली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याची घोषणा केल्यानंतर यंदाची निवडणूक रंगतदार टप्प्यावर येऊन ठेपली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी बुधवारी पहाटे जरांगे पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.

अंतरवाली सराटीत जाऊन चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. गेल्या १० दिवसांतील मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांची मनधरणी करत असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करू नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांना करण्यात आल्याचे समजते. यावर आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर झाल्यानंतर काही तासांतच चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. चिवटे यांच्याआधी मंगळवारी रात्री बीडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी