महाराष्ट्र

इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारले

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उचलणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या वेळी नीलम गोर्‍हे यांनी अपघातातून वाचलेल्या मुलांचे सर्वेक्षण झाले असून आता महिलांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला. त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी ते लोकांना तातडीने मदत देत आहेत का? तसेच सर्व बालके व महिलांना आवश्यक सुविधा पुरविल्या जातात का? असे विचारले. या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा! ICC चा बांगलादेशच्या मागणीला नकार, सुरक्षेला धोक्याचा दावाही फेटाळला - रिपोर्ट

मोदी-शहांविरोधात घोषणाबाजी महागात! 'त्या' विद्यार्थ्यांचे तात्काळ निलंबन होणार; JNU चा इशारा; एफआयआरही दाखल

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

Zilla Parishad Election Maharashtra : आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा?

भाजपकडून अजितदादांची कोंडी; सावरकरांचे विचार मानावेच लागतील!