कॉकरोच जनता पार्टीचा गुरुवारी पुण्यात एल्गार  
महाराष्ट्र

कॉकरोच जनता पार्टीचा गुरुवारी पुण्यात एल्गार

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवार, ११ जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे.

Swapnil S

पुणे : कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवार, ११ जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पक्षाचे हे दुसरे आंदोलन आहे.

‘कॉकरोच’ पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात कॉकरोच पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करेल. हे आंदोलन गुरुवारी दुपारी ४ वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर होणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, दीपके यांनी आपण हे आंदोलन देशभर घेऊन जाणार असल्याचे काल एक्सवरील एका पोस्टवर जाहीर केले होते.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती