महाराष्ट्र

बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करा -विजय वडेट्टीवार

नवशक्ती Web Desk

नागपूर : बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी राज्य सरकारकडे केली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते विधानसभेत बोलत होते.

ते म्हणाले की, कोणत्याही विशिष्ट समुदायाला कोट्याचा लाभ मिळण्यास आमचा विरोध नाही. राज्यातील प्रत्येक समाजात किती मागासलेले लोक आहेत हे जनगणनेतून शोधले पाहिजे. ऑक्टोबरमध्ये, बिहारमधील नितीश कुमार सरकारने त्यांच्या जात सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले, ज्यामध्ये असे दिसून आले की इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अत्यंत मागासवर्गीय राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के आहेत. बिहार जात सर्वेक्षण बाहेर आल्यापासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वडेरा यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देशात जात जनगणनेसाठी दबाव आणत आहेत. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, राहुल गांधी यांनी जाती जनगणनेचे वर्णन "एक्स-रे" असे केले होते जे लोकसंख्येतील ओबीसी, दलित आणि आदिवासींचे प्रमाण उघड करील, असे त्यांनी सांगितले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस