महाराष्ट्र

अजित पवार यांच्या भंडाऱ्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात गोंधळ; आरक्षणाच्या मुद्यावरुन तरुणाची घोषणाबाजी

नवशक्ती Web Desk

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, असी घोषणा देत एका व्यक्तीने हातातील बॅनर फडकावलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रमच्या ठिकाणावरुन बाहेर नेलं. राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. अजित पवार आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करत असतानाच हा गोधळ झाल्याचं सांगितलं जात आहे.

आरक्षण देताना ते सुप्रिम कोर्टात टीकलं पाहिजे. इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, असे सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केला. आज भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डेंग्यूतून बरं झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारकडून लोकांना अनेक लाभ दिले जात आहेत. हे लोकाभिमुख सरकार आहे. लोकांना हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. लोकांना हे सरकार त्यांचं वाटलं पाहिजे. सव्वा वर्षात अनेक चांगले निर्णय महायुती सरकारने घेतलेत. एका रुपयात पीक विमा योजना ते त्यांचंच एक उदाहरण असल्याचंही ते म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस