महाराष्ट्र

काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता; जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने नाराजी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाला दिलेल्या दिवसभराच्या भेटीमुळे आणि आमदारांशी केलेल्या चर्चांमुळे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.

रविकिरण देशमुख

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाला दिलेल्या दिवसभराच्या भेटीमुळे आणि आमदारांशी केलेल्या चर्चांमुळे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयात जाणवणारी नाराजी आणि नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया यावरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) हे प्रकरण सहज घेण्याच्या मूडमध्ये नाही, हे स्पष्ट होते. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सध्याची स्थिती पाहता काहीतरी होणार हे नक्कीच.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सपकाळ यांच्याकडून तत्काळ अहवाल मागवला आहे आणि त्यांनी विधान भवनात काँग्रेस पक्ष कार्यालयाला दिलेली भेट हे त्याचेच संकेत असल्याचे मानले जात आहे. जेव्हा संभाव्य कारवाईबाबत विचारले गेले, तेव्हा सापकळ म्हणाले की, थोडी वाट पाहा.

दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे प्रतिनिधी शुक्रवार, सकाळी ११.३० वाजता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून भास्कर जाधव व अंबादास दानवे हे प्रतिनिधी राज्यपालांना विधेयकावर स्वाक्षरी करू नये, अशी विनंती करतील.

महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक विधिमंडळात मांडले गेले आणि मतदानासाठी ठेवले गेले, तेव्हा नेमके काय झाले. या वादग्रस्त विधेयकाला विरोध नोंदवण्याऐवजी ते सहज पारित कसे झाले? हे जाणून घेण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली होती. विधान भवनात पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मान्य केले की त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. ते म्हणाले की, १० जुलै रोजी हे विधेयक मांडले जाणार आहे, याची मला माहिती नव्हती. मला माहीत असते तर मी विधेयक फाडून टाकले असते. त्या दिवशी वडेट्टीवार हे चंद्रपूर येथे, त्यांच्या मूळ जिल्ह्यात, जिल्हा सहकारी बँक निवडणुकांसाठी गेले होते. काँग्रेस पक्षाच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे आमदारांनी सभागृहात जे मुद्दे उपस्थित करायला हवे होते, ते दुर्लक्षित करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

...तर मी दौरा रद्द केला असता - वडेट्टीवार

वडेट्टीवार यांनी सांगितले की, पक्षाने त्यांच्यासह विधानसभेतील उपनेते अमीन पटेल आणि विधान परिषदेमधील काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांना त्या दिवशी काय घडले, याचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, सभागृहातील नियोजन चांगले असायला हवे होते, हे मी मान्य करतो. मी चंद्रपूर येथे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी होतो. जर मला माहित असते की त्या दिवशी हे विधेयक येणार आहे, तर मी माझा दौरा रद्द केला असता.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास