File Photo
File Photo ANI
महाराष्ट्र

महाराष्ट्रासह, मुंबईमध्ये कोरोना डोके वर काढतोय...

वृत्तसंस्था

महाराष्ट्रासोबतच मुंबईमध्ये कोरोना पुन्हा एकदा आपले डोके मोठ्या प्रमाणावर वर काढताना दिसत आहे. दिवसेंदिवस आकडेवारी वाढत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे १८८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत १२४२ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५०६ लोक कोरोनातून बरेही झाले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आता राज्यात कोरोनाचे ५९४७ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना स्फोटाची परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोविड प्रोटोकॉलचे पालन करून योग्य वागण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, लोकांनी योग्य प्रकारे मास्क लावावे आणि लस घ्यावी.

राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी वाढत्या कोरोना प्रकरणांवर सविस्तर चर्चा केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य अधिकार्‍यांना तात्काळ चाचण्या घेण्यास सांगितले आहे.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?