महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व ग्रॅज्युटीचे कोट्यवधी थकले; सरकारने सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम ॲडव्हान्स देण्याची काँग्रेसची मागणी

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला सध्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येते. मात्र ही रक्कमही अपूर्ण देण्यात येत असल्याने गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रकमांचा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची देणी मिळण्यात अडचण येऊ शकते. यासाठी सरकारने सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला एसटीकडून प्रस्ताव गेल्यानंतर न देता एसटी महामंडळाला अडव्हांस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.

भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून या साठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. पण कर्मचाऱ्यांकडून कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिस्सा गेले अनेक महिने ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम अंदाजे १५०० कोटी रुपये इतकी झाली आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे कोट्यवधी रुपयांचे व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्ट सुद्धा अडचणीत सापडल्या आहेत. ही रक्कम ट्रस्टकडे वेळेत भरणा करण्यात आली नाही तर भविष्यात या रकमेतून दिली जाणारी एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची देणी देण्यात अडचणी निर्माण होतील, असा दावा बरगे यांनी केला आहे.

आगाऊ रक्कम दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल

त्यामुळे वर्षभराची होणारी साधारण ४४०० कोटी रुपये इतकी सवलत मूल्य रक्कम सरकारकडून आगाऊ दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल, असा दावा बरगे यांनी केला असून, वर्षभराची सवलत मूल्य रक्कम सरकारने एसटीला आगाऊ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत