ANI
ANI
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून १० जुलैपर्यंत संचारबंदी लागू

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याच्या अनेक भागात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर निषेध रॅली काढून त्यांच्या होर्डिंगला काळे फासले. काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोडही करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार राज्यात परतल्यानंतर बंडखोरांच्या संघर्षात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आजपासून १० जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस उपायुक्तांची बैठक झाली.

मुंबईतील सर्व राजकीय पक्ष, मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाच्या नगरसेवकांची कार्यालये, निवासी शाखांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक राजकारण्यांशी समन्वय साधून माहिती अगोदरच तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये बैठका घेऊन येथे चोख बंदोबस्त ठेवण्यास सांगितले आहे. विशेष शाखा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी संबंधितांना आवश्यक माहिती तातडीने देण्यास सांगितले आहे. या परिसरात संभाव्य राजकीय घडामोडींची माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस परिपत्रकात म्हटले आहे.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग