महाराष्ट्र

आईनेच केली नवजात चिमुरडीची हत्या

मुलगा होईल या अपेक्षेने चौथ्यांदा मातृत्व स्वीकारलेल्या महिलेच्या पदरी पुन्हा एक मुलगीच आल्याने ती नैराश्यात गेली आणि या मानसिक तणावातून तिने आपल्या अवघ्या काही दिवसांच्या चिमुरडीचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना डहाणू शहरातील लोणपाडा येथे समोर आली आहे.

Swapnil S

पालघर : मुलगा होईल या अपेक्षेने चौथ्यांदा मातृत्व स्वीकारलेल्या महिलेच्या पदरी पुन्हा एक मुलगीच आल्याने ती नैराश्यात गेली आणि या मानसिक तणावातून तिने आपल्या अवघ्या काही दिवसांच्या चिमुरडीचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना डहाणू शहरातील लोणपाडा येथे समोर आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री डहाणू उपजिल्हा रुग्णालयात घडली असून, याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम शहा ही महिला कोलकातातून काही दिवसांपूर्वी आपल्या आई-वडिलांकडे डहाणूतील लोणपाडा येथे आली होती. येथेच तिची गृह प्रसूति झाली होती. चौथ्यांदा मुलगीच झाल्याने ती मानसिक नैराश्यात होती. शनिवारी या नैराश्याच्या गर्तेत असताना पूनमने आपल्या नवजात चिमुरडीचे नाक आणि तोंड दाबून तिची हत्या केली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video