महाराष्ट्र

आईने साडी नेसू न दिल्याने मुलीची आत्महत्या ; पुण्यातील धक्कादायक घटना

नवशक्ती Web Desk

गणेशोत्सव दिवशी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. साडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. देहू रोड परिसरातील शिवाजी विद्यालयात ती इयत्ता सातवीत शिकत होती. तील गणेशोत्सवा दरम्यान, साठी नेसायची होती परंतु तीच्या आईन तीला साडी नेसण्यासाठी नकार दिला होता. या गोष्टीचा राग मनात धरत तीनं आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुष्मिता प्रधान(१३) असं या आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. तीच्या आईने साडी नेसण्यास मनाई केल्याचा राग मनात धरुन या मुलीने आत्महत्या केली आहे. आईने नकार दिल्याने ती बाथरुममध्ये रडत गेली. काही काळ तीनं स्वत:ला कोंडून घेतलं. काही वेळानंतर तीच्या बहिनीने बाथरुमचा दरवाजा वाजवला. पण काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे घरातील सर्व घाबरले. यानंतर बाथरुमचा दरवाजा तोडून घरच्यांनी आत प्रवेश केला. यावेळी मुलगी स्कार्फ बांधून लटकलेल्या आवस्थेत सापडली.

हे पाहून सर्वांनी आक्रोश केला. शेजारच्यांनी पोलीसांत या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल