महाराष्ट्र

मुरूड किनाऱ्यावर ग्रीन टर्टल जातीचे मृत कासव

मुरूड किनाऱ्यावर रविवारी दुपारच्या सुमारास १ फूट लांब व १० किलो वजनाचे ग्रीन टर्टल जातीचे मृत कासव किनाऱ्यावर वाहून आल्याचे निदर्शनास आले.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : मुरूड किनाऱ्यावर रविवारी दुपारच्या सुमारास १ फूट लांब व १० किलो वजनाचे ग्रीन टर्टल जातीचे मृत कासव किनाऱ्यावर वाहून आल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी खोरा बंदर, गायमुख, राजपुरी, मुरूड, राजवाडा परिसरात अशी अनेक मृत कासव आढळून आली आहेत.

प्राणिमित्रांच्या माहितीनुसार, खोल समुद्रात असणाऱ्या मोठ्या जहाजांच्या पंखामध्ये अडकून कासव जखमी होऊन मृत होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वी मुरूड किनाऱ्यावर कासव सायंकाळी अंडी टाकण्यासाठी येत असत व १०० हून अधिक अंडी टाकून कासव त्यावर मातीचा ढिगारा करून कासव समुद्रात जात असत. असे वर्षातून ३ वेळा होत असे, परंतु आता समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढल्याने अंडी टाकण्यासाठी कासव येण्याचे बंद झाल्याचे म्हटले जात आहे.

वारंवार समुद्री कासव मृत होण्याचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून यावर राज्य सरकारकडून कठोर पावले उचलली जावीत, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य पर्यावरण विभागाने याची दखल घेऊन वारंवार घडणाऱ्या घटनांवर प्रतिबंध आण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्थरातून मागणी करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी