महाराष्ट्र

नेरळ हुतात्मा चौकात मोराचा मृत्यू

Swapnil S

कर्जत : नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरातून टाटा कंपनीची वीज वाहिनी जाते. त्या भागातील फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराचा वीज वाहिनीला धडक लागल्याने मृत्यू झाला. मृत झालेला राष्ट्रीय पक्षी असल्याने त्यावर शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जाणार आहेत.

फॉरेस्ट टेकडी येथून हा मोर मोरोशी भागाकडे जात असताना तेथून वाहणाऱ्या टाटा कंपनीच्या वीजवाहक तारांना त्या मोराचा स्पर्श झाल्याने तो धाडकन जमिनीवर कोसळला. त्यावेळी हुतात्मा चौकात असलेले नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लिये आणि नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे कार्यकर्ते किशोर भोईर यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर तत्काळ वन कर्मचारी हे घटना स्थळी पोहचले आणि त्यांनी मोराला उचलून टॅक्सी स्टँड कार्यालयात आणले.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान