महाराष्ट्र

दिपाली सय्यद यांची बदनामी; कोर्टात आरोपीचे आत्मसमर्पण

काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते

नवशक्ती Web Desk

शिवसेनेच्या नेत्या आणि मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिचा माजी कर्मचारी भाऊसाहेब रामदास शिंदे याने अंधेरीतील लोकल कोर्टात आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पणानंतर त्याची कोर्टाने पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका केली होती. काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, तिने २०१९ साली एक पाकिस्तानी पासपोर्ट काढले आहे. त्या पाकिस्तानी नागरिक असून, त्यांचे लंडन आणि दुबई येथे कोट्यवधी रुपयांची प्रॉपटी आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या बंगल्यात दिपाली चार दिवस वास्तव्यास होत्या, असा आरोप केला होता. या आरोपांमुळे दिपाली यांची बदनामी झाली होती. त्यामुळे त्यांनी भाऊसाहेब शिंदे याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भाऊसाहेबविरुद्ध ५०९, ५००, ५०६ (२) भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. ही शोधमोहीम सुरू असताना दोन दिवसांपूर्वी भाऊसाहेब शिंदे हा अंधेरीतील लोकल कोर्टात हजर झाला.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत