तीन वर्षांत मेट्रो प्रकल्प पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; २ लाख ८० हजार कोटींच्या मेट्रो जाळ्याला गती (Photo-X/@MahaDGIPR)
महाराष्ट्र

तीन वर्षांत मेट्रो प्रकल्प पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; २ लाख ८० हजार कोटींच्या मेट्रो जाळ्याला गती

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. अनावश्यक विलंबामुळे होणारी प्रकल्पातील खर्चवाढ टाळण्यासाठी काम सुरू झाल्यापासून मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करा, असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील प्रस्तावित नवे मेट्रो प्रकल्प आणि सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांची माहिती देण्यात आली. सध्या राज्यात १७४ कि.मी. मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून २९१ कि.मी. मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय १३० कि.मी. मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून ८७.१५ कि.मी. मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मेट्रो-१० मार्गाची उभारणी लवकरच

यावेळी बैठकीत मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-१० मार्गाची माहिती देण्यात आली. या प्रकल्पासाठी ८ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ९.६८ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील पाच इलेव्हेटेड स्टेशन असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित मेट्रो मार्ग आणि लांबी

  • मुंबई मेट्रो-११ (अणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडिया) : १७.५१ कि. मी.

  • हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर-सासवड रोड : १६.६८ कि.मी.

  • नवी मुंबई मेट्रो-१ ए आणि २ (बेलापूर-सागर संगम आणि पेंधर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) : १७. ०९ कि.मी.

  • कान्हान नदी-कान्हान सिटी (नागपूर फेज-२ विस्तार) : १. ४५ कि.मी.

  • मुंबई मेट्रो-८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ ) : ३४. ९० कि.मी.

  • मुंबई मेट्रो-१० (गायमुख-छत्रपती शिवाजी महाराज चौक) : ९.२० कि.मी.

  • मुंबई मेट्रो-१३ (शिवाजी चौक-वसई-विरार): २५.०३ कि.मी.

  • मुंबई मेट्रो-१२ ए (मानपाडा-कल्याण-खुटारी-तळोजा) : १८.४० कि.मी.

  • मुंबई मेट्रो-३ विस्तार (कफ परेड-नेव्हीनगर) : १.४० कि.मी.

  • मुंबई मेट्रो-१४ (कांजूरमार्ग -बदलापूर) : ४५.१५ कि.मी.

  • पुणे मेट्रो टप्पा -३ (निगडी-वाकड-नाशिक फाटा-चाकण) : ४२ कि.मी.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी