महाराष्ट्र

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

आरोपी मुलगा हा १७ वर्ष ८ महिन्याचा आहे. परंतु निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा.....

Suraj Sakunde

पुणे: कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलानं दारू पिऊन बेदरकारपणे अलिशान पोर्श गाडी चालवत एका दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यातच अल्पवयीन आरोपीला मिळालेल्या शिक्षेवरूनही लोकांनी नाराजी व्यक्त केली. लोकांच्या भावना पाहता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. दरम्यान आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत पुढील कारवाईबद्दल त्यांनी माहिती दिली.

गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानले जाईल-

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पोलिसांनी या प्रकरणात ३०४ अ नाही नाही तर ३०४ हे कलम लावलं आहे. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा १७ वर्ष ८ महिन्याचा आहे. परंतु निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. पोलिसांनी आपल्या अर्जात तसं नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका मान्य केली नाही.”

कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक-

कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा पोलिसांना देखील धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले होते. याच निर्णयाविरोधात पोलीस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा ज्युवेनाईल बोर्डालाच रिव्ह्यू करायला सांगितलं, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्याप्रकरणी मुलाच्या वडिलांना अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. याशिवाय ज्या बारमध्ये त्यांना दारू पिऊ दिलं, तेथील बार मालक आणि मॅनेजर यांच्यावरही कारवाई होणार आहे.

पबच्या बाबतीत नियमांचं पालन केलं जावं...

यासोबतच पबच्या बाबतीत नियमांचं पालन केलं जावं, असं फडणवीस म्हणाले. यासोबतच पबच्या बाबतीत नियमांचं पालन केलं जावं, असं फडणवीस म्हणाले. पबमध्ये आयडेंटी चेकिंग होत नाही. ओळख आणि वय पाहूनच आत सोडलं पाहिजे. ज्यांना लायसन्स दिले आहेत, ते नियम पाळतायत का नाही याची माहिती घेण्यात यावी. नवीन लायसन्स घेताना तो रहिवासी भाग असू नये, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली