महाराष्ट्र

देवेंद्रभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं; आझाद मैदान घोषणांनी दणाणले!

महायुतीचा महाशपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानात थाटामाटात पार पडला. शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्यासाठी आगेकूच केली त्याच वेळी देवाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला.

Swapnil S

मुंबई : महायुतीचा महाशपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानात थाटामाटात पार पडला. शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्यासाठी आगेकूच केली त्याच वेळी देवाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. दरम्यान, महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणी, सिने कलाकार, कोळी महिला आकर्षण ठरले.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. राज्यातील सहा कोटी मतदारांनी मतदानाचा कौल महायुतीला दिला. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला आणि तब्बल १२ दिवसांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानात पार पडला. यावेळी आपणही या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे म्हणून अंगणवाडी सेविका, कोळी महिला उपस्थित होत्या. यावेळी देवा भाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोळी महिलांनी नृत्य सादर करत देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

परिसर गर्दीने फुलला

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे महायुतीचे कार्यकर्ते खांद्यावर भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करीत गुरुवारी सकाळपासूनच आझाद मैदानाच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे हळूहळू आझाद मैदानाच्या आसपासचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. काही वेळातच हे भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या आणि महायुतीच्या जयघोषाच्या घोषणा देत कार्यकर्ते आझाद मैदान परिसरात दाखल झाले. यावेळी हे कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी देत होते.

सिने कलाकार, उद्योगपतींची हजेरी!

मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान हे दोघे पहिले होते. यासंबंधीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये शाहरूख खान आणि सलमान खान यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. तर दुसऱ्या बाजूला एका व्हिडीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत शाहरूख खान हे तीन जण बसलेले दिसत आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील या सोहळ्याला हजेरी लावली. याशिवाय संजय दत्त, रणवीर सिंह, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित-नेने, जॅकी श्रॉफ आणि अर्जून कपूर या कलाकारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.

मुस्लिम महिलांच्या हाती अमित शहा यांचा फोटो

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम महिलांनी हातात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेले बॅनर्स झळकवत आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य