महाराष्ट्र

...तर मोदींचे ‘४०० पार’चे स्वप्न पूर्ण होणार नाही - अत्राम; अजित पवार गटात जागावाटपावरून नाराजी!

महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला केवळ ३ ते ४ जागांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला केवळ ३ ते ४ जागांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता वाढली असून, पक्षातील इच्छुकांनी आता उघडपणे नाराजी बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात गेले आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी गडचिरोलीची जागा गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० जागांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, ही जागा राष्ट्रवादीलाच मिळेल, अशी खात्री आहे, मात्र, जर मी कमळावर लढलो, तर अजितदादांना चालणार नाही, असे सांगून त्यांनी याबाबत खुलासाही केला.

महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तसेच जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथे उमेदवारीची मागणी केली. राष्ट्रवादीला किमान १० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली ताकद असलेल्या मतदारसंघात राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली होती. मात्र, शिरूर, बारामती, रायगड आणि आणखी एखादी जागा वगळता राष्ट्रवादीच्या पदरात फार काही पडेल, अशी शक्यता नाही. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता केवळ चर्चेची औपचारिकताच बाकी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गडचिरोली लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी सध्या येथे भाजपचेच खासदार आहेत. मात्र, सध्या विद्यमान खासदारांविषयी येथे नाराजी असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या सर्वेक्षणातूनही हे पुढे आले आहे. त्यामुळे या जागेची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती आणि विद्यमान मंत्री धर्मराजबाबा अत्राम यांनाच मैदानात उतरविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, भाजप ३ त ४ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. त्यामुळे गडचिरोलीची जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे धर्मराजबाबा अत्राम यांनी नाराजी व्यक्त केली असून, गडचिरोलीची जागा गेली, तर पंतप्रधान मोदी यांचे ४०० पार जागांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे अत्राम म्हणाले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video